घरमहाराष्ट्रतिसऱ्या लाटेचा धोका आहे तर दारुविक्रीला मुभा का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

तिसऱ्या लाटेचा धोका आहे तर दारुविक्रीला मुभा का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

Subscribe

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी भाजप पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला असून राज्भरात शंखानाद आंदोलन करत आहे. (BJP’s agitation to reopen temples) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्त्वात पुण्यातील कसबा गणपती मंदिराच्या परिसरात भाजपने आंदोलन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्या लाटेचा धोका आहे तर दारुविक्रीला मुभा का? असा सवाल केला. तसंच, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपल्या देवस्थानापासून सरकार रोखू शकणार नाही, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. दरम्यान, आज भाजप मंदिरं उघडण्यासाठी राज्यभरात शंखानाद आंदोलन करत आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील कसबा मंदिरात जाऊन आरती केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार आज संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असा दावा केला.

- Advertisement -

“हिंदू माणूस मंदिरात जाण्यापासून, मुस्लिम माणूस मशिदीत जाण्यापासून, ख्रिश्चन माणूस चर्चमध्ये जाण्यापासून हे सरकार थांबवू शकणार नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मंदिरं पूर्णपणे बंद ठेवणं चुकीचं आहे. नियम करुन द्या. एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत, मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण मंदिरं आता बंद ठेवू नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मंदिरं फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्रोतही आहेत. मंदिराबाहेरच्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचं काय? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

त्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार?

चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षे वारी बंद असल्याबद्दलही भावना व्यक्त केली आहे. चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. तर लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक कुलुप तोडून मंदिरात घुसतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -