घरताज्या घडामोडीइंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने सोमवारी राज्यव्यापी आंदोलन केले. यावेळी इंधन दरवाढ मागे घ्यावी म्हणून राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसने धरणे आंदोलन करून मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोनाच्या संकट काळात गरीब, कामगार, मध्यवर्गीय, छोटे व्यावसायिक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देण्याची गरज असताना मोदी सरकार मात्र इंधनाची दररोज भाववाढ करून जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे, अशी टीका थोरात यांनी यावेळी केली.

- Advertisement -

दरम्यान, आज मंगळवारी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून राज्यातील सर्व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकार जोपर्यंत ही अन्यायकारक दरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -