घरCORONA UPDATEमहाराष्ट्रात आज उच्चांकी लसीकरण; ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस

महाराष्ट्रात आज उच्चांकी लसीकरण; ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस

Subscribe

राज्यात आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला आहे. मुंबईत देखील आज ५० हजार जणांचे लसीकरण झाले.

आज अखेर महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आज तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले.

- Advertisement -

राज्यात आज ४३ हजार १८३ नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. बुधवारी हा आकडा ३९ हजार ५४४ इतका होता. त्यामुळे एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जवळपास चार हजारांनी वाढला. तसेच मागील २४ तासांत ३२ हजार ६४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.२० टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -