Covaxin: २-१८ वयोगटातील लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन सर्वात सुरक्षित, भारत बायोटेकचा दावा

bharat biotech claims covaxin id safe for 2-18 years age of children
Covaxin: २-१८ वयोगटातील लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन सर्वात सुरक्षित, भारत बायोटेकचा दावा

देशातभरात कोरोना आणि कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. अनेक राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आता लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल समोर आला असून २ ते १८ वयोगटातील लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन ही लस सर्वात प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकडून करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमधील वॉलेटियर्समध्ये लसीचा चांगला प्रभाव दिसून आला आहे. कोव्हॅक्सिन लस सर्वात सुरक्षित तसेच सहनशील आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाले आहे.

देशातील नागरिक लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आजवर चिंतेत होते. मात्र २ वर्षांवरील मुलांचे पालक त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देऊ शकतात. लहान मुलांसाठी ही लस सुरक्षित आणि इम्युनोजेनिक सिद्ध झाली आहे त्यामुळे पालकांनी कोणतीही शंका मनात ठेवता मुलांचे लसीकरण करावे असे भारत बायोटेकने म्हटले आहे.

 

देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे केंद्र सरकारने जानवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना बुस्टर डोस देण्याची घोषणा देखील केली आहे.

डीसीजीआयने २५ डिसेंबरला कोव्हॅक्सिनला लहान मुलांच्या आपातकालीन वापराला मंजूरी दिली आहे. ११ ऑक्टोर रोजी भारत बायोटेकने लसीच्या आपतकालीन वापरासाठी अर्ज दाखल केला होता. डीजीसीआयकडून लहान मुलांच्या लसीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. ३ जानेवारील २०२२पासून देशातील १५-१८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.


हेही वाचा –  Corona record- जगभरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात १५ लाख रुग्ण, तर ७००० जणांचा मृत्यू