घरमहाराष्ट्रनाशिकजायखेड्यात कोरोनाचा दुसरा बळी

जायखेड्यात कोरोनाचा दुसरा बळी

Subscribe

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असताना त्यांचा मालेगांव येथील रुग्णालयात उपचार घेत असतानाच मंगळवारी (दि. २३) सायंकाळी निधन झाल्याच्या घटनेने जायखेडा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत केली जात आहे.

बागलाणमधील कोरोना महामारीच्या आजाराने मृत्यू झालेल्याची संख्या आता दोन झाली आहे. जायखेडा येथील ३२ वर्षीय वाहन चालकांचा गत पंधरवाडयात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यू पश्‍चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले ३० हून अधिक व्यक्ती जायखेडा परिसरात करोनाने बाधित झाले होते.
या मयत वाहनचालकांवर उपचार करणारे जायखेडा येथील खासगी डॉक्टरसह त्यांचे कुटूंबिय देखील कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांना अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या नंतर सबंधित डॉक्टरांवर माहिती लपविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच डॉक्टरांचे वडील (वय ५९) हे देखील कोरोनाबाधित असल्याने त्यांचेवर मालेगावं येथील फरहान रूग्णालयात उपचार सुरू असतांना मंगळवार (ता. २३) रोजी त्यांचे निधन झाले आहे. यामुळे जायखेडा गावावर शोकळला पसरली आहे. मुल्हेर येथील जनता विद्यालयात गत दोन वर्षापुर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. कुटूंबातील सर्व सदस्य करोना पॉझिटीव्ह व डॉक्टर मुलावर जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने एकाकी विचारात पडलेल्या वडीलांना अखेर मृत्यूने गाठल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डाॅक्टरावर कारवाई ही सुडबूध्दीने :
मागील काही दिवसांपूर्वी मयत वाहनचालकावर खाजगी डाॅक्टरांनी उपचार केले असल्यामुळे त्यांच्यावर जायखेडा पोलीस ठाण्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उमेश रामोळे यांनी तक्रार करत डाॅक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे जायखेडासह परिसरात शासकीय यंत्रणेने केलेली कारवाई ही सुडबूध्दीने केली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
कारवाईचा निवेदनाद्वारे निषेध
आरोग्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव यांनी निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे. रुग्ण आल्यावर खासगी डॉक्टर घाबरून दवाखान्यातून त्यांना परतावून लावण्याचा प्रकार घडला होता. अशा परिस्थितीत डॉ. बागूल रुग्णांना तपासून योग्य औषधोपचार करत असताना वाहनचालकाच्या मृत्यूनंतर डॉ. बागूल यांना दोषी ठरवल्याचे निवेदनातून म्हटले आहे. कुठल्याही रुग्णाने डॉक्टरांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिल्यावरच डॉक्टर योग्य ते उपचार करत असतात. डॉ. बागूल यांनीही तेच केले. त्याच चुकीचे काहीही नव्हते, असेही त्यांनी निवेदनातून सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -