घरमहाराष्ट्रCorona: मास्कशिवाय पुण्यात फिरणाऱ्या तरुणाला कोर्टाने दिला दणका

Corona: मास्कशिवाय पुण्यात फिरणाऱ्या तरुणाला कोर्टाने दिला दणका

Subscribe

लॉकडाऊनचे उल्लंघन करत निवांत घराबाहेर पडल्याने पुणे पोलिसांनी तरूणावर केली कारवाई

देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही अनेक लोकं नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून चांगलीच कडक कारवाई देखील करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. मात्र जे मास्कविना फिरताना दिसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुण्यात मास्कशिवाय फिरणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. हा तरुण पुणे कॅम्प भागात राहणारा असून तो मास्कशिवाय फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याशिवाय त्याने लॉकडाऊनचे उल्लंघन करत निवांत घराबाहेर पडल्याने पुणे पोलिसांनी यावर तत्काळ कारवाई केली आहे. त्याच्यावर कारवाई करीत त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून १००० रुपयांचा दंडदेखील आकारण्यात आला आहे.


LockDown: इंस्टाग्रामवर पठ्ठ्यानं शोधले ग्राहक; तिप्पट किंमत घेत विकली दारू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -