घरमहाराष्ट्रUnlock: पुण्यात १ नोव्हेंबरपासून खुली होणार उद्यानं मात्र...

Unlock: पुण्यात १ नोव्हेंबरपासून खुली होणार उद्यानं मात्र…

Subscribe

पुणेकरांचा श्वास मोकळा पण या नियमांचे करावे लागणार पालन

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून देशात कोरोना बाधितांचा आकडा ८० लाख पार झाला आहे. मात्र मुंबई पाठोपाठ पुणे शहरामध्ये आता कोरोना वायरसच्या फैलावाची गती मंदावली आहे. दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली कित्येक महिने उद्यानं आणि बागा बंद होत्या. मात्र १ नोव्हेंबर पासून शहरातील उद्याने, बागा सुरू होणार त्याची नियमावली महापालिका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, उद्यानं खुली होणार असली तरी ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालच्या मुलांना बागेत अद्याप प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून कंटेन्मेंट झोन वगळता सर्व शहरातली उद्यानं सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळात उघडी राहतील. दिवसभरात फक्त ४ तास बागा खुल्या असतील. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्क अनिवार्य आहे. बागा उघडल्या तरी बागेतली घसरगुंडी, झोपाळे, सी सॉ अशी खेळणी आणि ओपन जिममधली व्यायामाची उपकरणं वापरता येणार नाहीत. ८ महिने बंद असलेली शहरातील ८५ उद्याने १ नोव्हेंबर पासून खुली होणार आहेत. पण नियमभंग करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

पुणेकरांचा श्वास मोकळा पण या नियमांचे करावे लागणार पालन

  • सकाळी ६ ते ८ संध्याकाळी ५ ते ७ चारच तास उद्यानं खुली
  • मास्क,सॅनिटायजरचा वापर अनिवार्य
  • ६ फूट शारीरिक अंतर पाळणं बंधनकारक
  • १० वर्षांच्या खालील मुलं आणि ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक यांना प्रवेश नाही
  • घसरगुंडी, झोके ,सी सॉ ही खेळणी तसंच जिम, व्यायामाची सामुग्री वापरता येणार नाही
  • नियमभंग केल्यास संबंधित उद्यान बंद करणार

Corona: ‘डिसेंबरमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता मात्र पुणे पालिका प्रशासन सज्ज’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -