घरमहाराष्ट्रपुणेनृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रुग्णालयात दाखल; बेवारस स्थितीत होते पडून

नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील रुग्णालयात दाखल; बेवारस स्थितीत होते पडून

Subscribe

गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आले. स्वराज्य फाऊंडेशन एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून ज्या व्यक्तीची क्रेझ तरुणांमध्ये आहे ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील यांची. मात्र, हीच गौतमी पाटील या ना त्या कारणाने मात्र चर्चेत राहत आहे. तिच्या वडिलांच्या विषयावरूनही ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा त्याच विषयावरून गौतमी पाटील चर्चेत आली आहे. कारण, तिचे वडील बेवारस स्थितीत आढळून आले. त्यांना एका समाजसेवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.(Dancer Gautami Patil’s father admitted to hospital; Was lying in a desolate state)

गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आले. स्वराज्य फाऊंडेशन एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. हा व्यक्ती कोण आहे याची ओळख त्यांना नव्हती म्हणून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज व्हायरल केल्यानंतर गौतमी पाटील यांच्या वडिलांची भावजय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी हे गौतमीचे वडील असल्याचे सांगितले.

- Advertisement -

मॅसेज पाहून शोभा पेरपगार पोहचल्या रुग्णालयात

रविंद्र पाटील यांची भावजय शोभा आनंद नेरपगार या त्यांच्या मुलीसह हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोहचल्या. रविंद्र पाटील हे नृत्यांगना, गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभा नेरपगार यांनी दुजोरा दिला. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी ह्या दोघी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मला त्याबद्दल जास्त माहित नसल्याचे देखील शोभा नेरपगार यांनी सांगितलं.

हेही वाचा : विहार तलावाचे मिठी नदीत वाहून जाणारे पाणी अडविणार ; पुनर्प्रक्रियेनंतर वापरासाठी होणार उपयोग

- Advertisement -

उपचारासाठी गौतमीने घेतला पुढाकार

रवींद्र पाटील यांच्या प्रकृतीची माहिती कळताच गौतमी पाटील यांनी तिच्या मावशीला फोन करून वडिलांना पुण्यात घेऊन ये असे सांगितले. त्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले. या ठिकाणी त्यांच्या मावशी आणि धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेल्या.

हेही वाचा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जालन्यात कुठेही गोळीबार झाला नाही; शिंदे गटाकडून दावा

जेवढे शक्य होईल तेवढे करेल

याबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करीन. तसेच धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी देखील गौतमी पाटीलच्या वडिलांची त्यांच्या वतीने जेवढी काळजी घेता येईल तेव्हढी काळजी घेऊन एक मदतीचा हात दिल्याने गौतमी पाटीलने माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांचे देखील आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -