घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जालन्यात कुठेही गोळीबार झाला नाही; शिंदे गटाकडून दावा

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जालन्यात कुठेही गोळीबार झाला नाही; शिंदे गटाकडून दावा

Subscribe

शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी जालन्यात कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यात आहे.

जालना : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी राज्यातील राजकारण पेटताना दिसत आहे. तर आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. तर आता राजकीय नेते मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन करीत असताना दुसरीकडे मात्र, शिंदे गटाकूडन या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी वेगळाच दावा करताना दिसत आहे. यामध्ये एका मंत्र्यांने जालन्यात कुठल्याही प्रकराचा गोळीबार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.(Lathi charge on Maratha protesters : No firing anywhere in Jalna; A claim by the Shinde group)

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत प्रशासनाची चर्चा सुरू असताना अचानकपणे लाठीचार्ज करण्यात आला. या अमानूष लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना राजकीय नेते आता मराठा आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत आहेत. दरम्यान अशातच शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी जालन्यात कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्ला

देसाई म्हणाले की, सर्वच पक्षांनी मराठा आरक्षण मिळावे, ही भूमिका घेतली आहे. काही मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये कोण कमी पडलं, काय झालं.. तेव्हा दिल्लीत बैठका घ्यायला पाहिजे होत्या का? यात मी जाणार नाही. आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. पुन्हा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आम्ही बैठक घेत आहोत.

- Advertisement -

समर्थन नाही, चौकशीत दोषी आढळल्यानंतर कारवाई

शिंदे गटात असलेले शंभूराज देसाई म्हणाले की, काल जालन्यामध्ये जे काही झालं त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या घटनेचं शासन म्हणून आम्ही कधीच समर्थन करणार नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई केली जाईल.

हेही वाचा : राजेंसाठी मसणवट्यात जाऊ पण…: आंदोलनकर्त्यांनी उदयनराजेंचा शब्द राखला

काय म्हणाले होते शंभूराज देसाई?

आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराप्रकरणावर बोलताना शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, कालच्या जालन्यातील घटनेमध्ये अजिबात गोळीबार झाला नाही असा दावा त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे आंदोलनकर्ते यांनी भेटण्यासाठी आलेल्या नेत्यांना केलेल्या गोळीबारातील लहान छर्रे दाखविले असून, माध्यमांमध्येही ते प्रसारित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -