घरक्राइमDCM Fadnavis: वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली; घोसाळकर गोळीबारप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

DCM Fadnavis: वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली; घोसाळकर गोळीबारप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

घडलेली घटना ही वैयक्तिक वैमनस्यातून घडली आहे. परंतु, या घटनेला विरोधक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. घडलेली घटना ही गंभीर असली, तरीही त्याला राजकीय रंग देणं योग्य नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

मुंबई: मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोळीबाराची घटना ही वैयक्तिक वैमनस्यातून घडली आहे. परंतु, या घटनेला विरोधक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. घडलेली घटना ही गंभीर असली, तरीही त्याला राजकीय रंग देणं योग्य नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (DCM Fadnavis The incident happened out of personal enmity Devendra Fadnavis reaction to Abhishek Ghosalkar firing case)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीने मृत्यू व्हावा, हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. ही घटना गंभीर आहे, मात्र गोळ्या घातल्या त्या मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळालेत. वर्षानुवर्षे ते एकत्र काम करत होते. आता कुठल्या विषयावरून बेबनाव झाला हे महत्त्वाचं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. योग्यवेळी ती माहिती तुम्हाला दिली जाईल, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

राज्य सरकार योग्य ती काळजी घेईल…

गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र, त्याचं राजकारण करणं योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ही हत्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडली आहे, असं फडणवीस म्हणाले. ज्यांच्याकडे बंदुकांचं लायसन्स आहे, त्यांची पडताळणी करणं आणि नवीन लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे? याचा विचार सरकार नक्कीच करेल, असंही ते म्हणाले.

गाडीखाली श्वान आला तरी…

विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, त्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना गंभीर आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला, तर मला आश्चर्य वाटत नाही, ही व्यक्तिगत वैमनस्यातून झालेली हत्या आहे. विरोधी पक्ष त्याचं काम करत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Uday Samant : मॉरिस-घोसाळकर गॅंगवार उबाठा गटातीलच; सामंतांचा ठाकरे गटावर थेट हल्ला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -