घरक्राइमUday Samant : मॉरिस-घोसाळकर गॅंगवॉर उबाठा गटातीलच; सामंतांचा ठाकरे गटावर थेट हल्ला

Uday Samant : मॉरिस-घोसाळकर गॅंगवॉर उबाठा गटातीलच; सामंतांचा ठाकरे गटावर थेट हल्ला

Subscribe

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार करणारा फोटो ट्वीट करून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

मुंबई : मॉरिस नोरोन्हा याने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर केलेल्या गोळीबारात घोसाळकरांचा मृत्यू झाला. तर मॉरिस यानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (9 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन मॉरिस-घोसाळकर गॅंगवार हा उबाठा गटातीलच असल्याचे म्हणत थेट ठाकरे गटावर हल्लाबोल केला. (Uday Samant Morris Ghosalkar Gangwar Ubhata group Samantas direct attack on the Thackeray group)

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार करणारा फोटो ट्वीट करून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॉरिस नोरोन्हा नावाची जी व्यक्ती होती, त्याचं उद्दात्तीकरण करण्याचं काम कोण करत होतं हे सगळं उघड आहे. ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये असं म्हटलं आहे की, कफ परेड ते शिर्डी 15 दिवसांचा मदत यज्ञ, आणि अनेक बॅनरवर असं लिहिले आहे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला शिवसेना (उबाठा) मोठी करायची आहे असंही त्या बॅनवर लिहिले आहे. या गोळीबाराचं कुणी समर्थन केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की, यामध्ये काही काळंबेरं आहे. परंतु कालचा गॅंगवॉर हा उबाठा गटातीलच आहे. कारण, एकमेकांच्या स्पर्धेमधून हे हत्याकांड घडलं. काल जे झालं ती दुर्दैवी घटना आहे. असं विरोधकांच्याही घरात होऊ नये अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. या कठीण प्रसंगामध्ये आम्ही घोसाळकर कुटुंबीयांसोबत आहोत असे असतानाही मात्र कोणत्याही गोष्टींमध्ये राजकारण करायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचं अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असेही यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Esha Deol Divorce :’घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे’… ईशा देओलने मांडली व्यथा

पुढे बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मला मीडियालाही आवाहन करायचं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो ट्वीट करायचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करायची असे होत असताना मी जे आज कात्रणं दिली त्यामध्ये मॉरिस नोरोन्हा याला सामनातून मोठं करण्यात आलं हे यातून स्पष्ट होते. परंतु कोणतीही घटना घडली की, त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध जोडायचा आणि त्यंना बदनाम करायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं की, टीआरपी मिळते हे काही लोकांना माहिती असल्याने काही लोकांकडून हा कुटीर डाव खेळला जातो. आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की, आरोप प्रत्यारोप होऊ शकतात हे आम्ही समजू शकतो, टीका होऊ शकते, हे देखील समजू शकतो. पण आपल्या अंगावर आलेलं पाप हे दुसऱ्याच्या माथी मारायचं आणि त्यांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय आहे त्याला छेद आपण देखील सगळ्यांनी दिला पाहिजे असेही आवाहन मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केलं.

- Advertisement -

हेही वाचा : Dahisar Firing: …ती तिसरी व्यक्ती कोण? अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

जे कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेत, काही ट्वीट देखील आहेत म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे. असं मॉरिस नरोन्हा याने टाकलेले ट्वीट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटला, त्याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडण्या अगोदर कोणाला भेटले? हा देखील आमच्या समोरचा एक प्रश्न आहे असाही गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -