घरमहाराष्ट्र'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागासाठी २९ जुलै पर्यंत मुदतवाढ

‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त सहभागासाठी २९ जुलै पर्यंत मुदतवाढ

Subscribe

राज्यातील सर्व कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता, यावे यासाठी २९ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता, यावे यासाठी २९ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली आहे.

कृषिमंत्र्यांचे आवाहन

योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपुर्वी नजिकची बँक आणि आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस 

अकोला, अमरावती, वर्धा आणि धुळे या चार जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. तर नागपूर, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सोलापुरमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस आणि बुलढाणा, अहमदनगर, कोल्हापुर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५ से १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा – आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -