घरदेश-विदेशदुबईहून परतलेल्या करोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू

दुबईहून परतलेल्या करोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू

Subscribe

राज्यात मंगळवारी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आल्याने राज्यात एकूण रुग्ण संख्या ४१ झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला, दुुबईहून ५ मार्च रोजी परतलेल्या या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात नव्याने भर पडलेल्या २ करोनाबाधित रुग्णांपैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा ४९ वर्षांचा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेवरून परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात आज १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १,१६९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षात आजपर्यंत ९०० जणांना भरती केले आहे.

- Advertisement -

दुबईहून परतलेल्या रुग्णाचा मृत्यू

आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १,१६९ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. दरम्यान, काल आणि आज राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था नवी दिल्ली येथील तज्ज्ञ पथकाने पुणे येथे भेट देऊन येथील करोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -