Eco friendly bappa Competition
घर ठाणे जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः आव्हाड यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या धक्कादायक क्लिपनंतर देखील पोलिसांत तक्रार न दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस, हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर असून हा जे जे हत्याकांडातला एक आरोपी असल्याचं स्पष्टीकरणं जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख असून माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे. मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता, असंही आव्हाड म्हणाले.

मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. कारण तक्रार दाखल करुनही काही होत नाही. फक्त चौकशीच्या नावांवर पोलीस काहीही करत नाही आणि आरोपी आपल्यासमोर फिरत असतो. मग तक्रार दाखल करुन तरी काय होणार?, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

आव्हाड समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप

जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर याला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोप दिला आहे. महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेरला ताब्यात घेतलं. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलीस स्टेशनबाहेर चांगलाच चोप दिला असून हे प्रकरण आणखीन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : पवारांचे राजकारण म्हणजे गद्दारी आणि.., आमदार गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल


 

- Advertisment -