घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरCabinet Meeting : 'या' तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचा...

Cabinet Meeting : ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Subscribe

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 गंभीर दुष्काळ असलेल्या आणि 16 मध्यम दुष्काळ असलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक देखील पाऊस न पडल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचमुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 गंभीर दुष्काळ असलेल्या आणि 16 मध्यम दुष्काळ असलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन आदेश म्हणजेच GR राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. (decision of state government in cabinet meeting to declare drought in ‘these’ taluka)

हेही वाचा – Cabinet Meeting : दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

- Advertisement -

जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यांमध्ये नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे. यांतील नंदुरबार, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ आहे. तर धुळे, बुलढाणा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम दुष्काळ आहे.

त्याशिवाय, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मध्यम आणि गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील मदतीबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मदतीबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. तर, आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाकडून पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यात आली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4 टक्के घट झाली आहे. ज्यामुळे रब्बी पेरण्या संथपणे सुरू आहेत. आतापर्यंत 12 टक्के पेरण्या झालेल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -