घरमहाराष्ट्रअपंगांसाठी रॅम्प जिन्याची मागणी

अपंगांसाठी रॅम्प जिन्याची मागणी

Subscribe

मध्य रेल्वेच्या स्थानकात अपंग प्रवाशांसाठी रॅम्पचे जिने बसविण्याची मागणी आधार अंध अपंग संस्थेने केली आहे. कर्जत, नेरळ, शेलू, भिवपुरी आणि वांगणी रेल्वे स्थानकातून अपंग प्रवासी दररोज प्रवास करीत असून, त्यांची 43 पायर्‍यांचा पादचारी पूल पार करताना दमछाक होत आहे.

संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापकांना या संदर्भात पत्र देऊन वांगणीपासून कर्जतपर्यंत असलेल्या रेल्वे स्थानकात रॅम्प जिने बसविण्याची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती संस्थेचे पदाधिकारी सर्व स्थानकात जाऊन देखील सादर करीत आहेत. वांगणी रेल्वे स्थानक परिसरात अंध आणि अपंग यांची वसाहत आहे, तर कर्जत आणि नेरळ या शहरी भागात देखील किमान 1 एक हजार अपंग राहत असून, ते नेहमी रेल्वेने प्रवास करीत असतात. मात्र मध्य रेल्वेच्या वांगणीपासून कर्जतपर्यंतच्या रेल्वे स्थानकात असलेल्या पादचारी पुलावर कुठेही अपंग प्रवाशांसाठी रॅम्प असलेले जिने नाहीत. त्यामुळे त्यांना फलाटावर पोहोचताना आणि एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी शारीरिक कसरत करावी लागत आहे.

- Advertisement -

नेरळ रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे अधिकारी शिरीष कांबळे, स्टेशन प्रबंधक जी. एस. मीना यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आधार अंध अपंग संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वझरकर, सचिव सुनील राजे, सहसचिव विकास कुलकर्णी, तसेच संघटनेचे कार्यकर्ते बन्सीलाल जाधव, संजय लोखंडे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -