घरमहाराष्ट्रनागपूरजुन्या पेन्शनबाबत कधी होणार निर्णय? Ajit Pawar यांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट

जुन्या पेन्शनबाबत कधी होणार निर्णय? Ajit Pawar यांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट

Subscribe

जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य सकारात्मक असून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

नागपूर : जुन्या पेन्शनसंदर्भातील निर्णयावरून राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहे. सरकार जुन्या पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने याबाबत कर्मचाऱ्यांना आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे काल (ता. 13 डिसेंबर) कर्मचारी संघटनेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटना संपावर ठाम आहेत. परंतु, याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार जुन्या पेन्शनच्या निर्णयाबाबत सकारात्मक असून पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत सरकार याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Deputy CM Ajit Pawar made the government’s position clear regarding old pension)

हेही वाचा – Ajit Pawar : “पीएचडी करून काय दिवे लावणार?”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, चिफ सेक्रेटरी, काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी त्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की, या जुन्या पेन्शनबाबत ज्या तीन लोकांची कमिटी केली होती. त्याबाबतचा अहवाल आलेला आहे. तो अहवाल मिळालेला आहे. त्या अहवालाच्याबद्दल एसीएस फायनान्स, चिफ सेक्रेटरी असे तीन-चार लोक बसून कामगार लिडर यांच्यासोबत चर्चा करतील. सरकारने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले की आहे की आम्हाला तुम्हाला पेन्शन द्यायची आहे. सभागृहात देखील सरकारने याबाबत माहिती दिली आहे.

तसेच, जुन्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा अभ्यास सुरू आहे, त्यांनी याबाबतची समिती नेमली आहे. परंतु, त्याच्याशी राज्य सरकारला हे लिंकअप करायचे नाही. परंतु, तो अहवाल जर का आला तो ही विचारात घेण्यात येईल. राज्य सरकारकडे जो अहवाल आला आहे, तो ही तपासण्यात येईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या पेन्शनबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जुनी पेन्शन हवीच आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत या संदर्भातील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, आम्ही याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली.

- Advertisement -

दोन दिवसांत सरकार अमित शहांची घेणार भेट

राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. काल (ता. 13 डिसेंबर) भोपाळ येथे झालेल्या भेटीमध्ये अमित शाह यांची आम्ही वेळ मागितली आहे. त्यानुसार, अमित शाह यांनी आम्हाला वेळ दिली आहे. शुक्रवारी म्हणजे 15 डिसेंबरला आम्ही विधीमंडळाचे कामकाज संपल्यावर दिल्लीला जाणार आहोत. तिथे रात्री 9 किंवा 10 वाजता अमित शाह यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -