घरताज्या घडामोडीअरे शहाण्या...तू आमदार आहेस ; मास्कवरून अजित पवारांनी पुतण्याला झापलं

अरे शहाण्या…तू आमदार आहेस ; मास्कवरून अजित पवारांनी पुतण्याला झापलं

Subscribe

मी भाषण करताना मास्क काढत नाही राव...अजित पवार संतापले

बारामती : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि इतर आवश्यक गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार करत आहेत. बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात लसीकरणाबाबत सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच मास्क वापरत नव्हता. त्यामुळे अजित पवारांनी अरे शहाण्या…तू आमदार आहेस. असं म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी आज (रविवार) अजित पवार बोलत होते. आम्ही वेगवेगळ्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्रिपुरातील घटनेमध्ये नांदेड, अमरावती आणि मालेगाव येथे जातीय दंगली उसळल्या. तसेच काही समाज कंठकांना त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. माझी एकच विनंती आहे की, आपली परंपरा जी आहे. ती परंपरा जातीय एकोपा ठेवणं आणि सलोखा कायम राखणं महत्त्वाचं आहे. असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

- Advertisement -

काल कर्जत-जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच मास्क वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही राव आणि तू मास्क वापरत नाही. हे बरोबर नाहीये. जर तिसरी लाट आली. तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागेल. असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा: …लवकरच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होतील, सुनील केदार यांची माहिती

- Advertisement -

बारामतीमध्ये लसीकरणावेळी मध्यांतरी प्रांत आणि पदाधिकाऱ्यांनी जसा कार्यक्रम राबवला होता. तसाच कार्यक्रम पुन्हा एकदा राबवावा. लसीकरण झाल्यानंतर जरी कोरोना झाला. तरीही व्यक्ती आपला जीव वाचवू शकते. कोरोनानं काही होत नाही ही भावना काढून टाका आणि ओव्हर कॉन्फिडन्स बाळगण्याचं काही कारण नाही. असे अजित पवार म्हणाले.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -