घरमहाराष्ट्रEknath Khadse : पन्नासहून अधिक आमदार अन् स्वत: उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांना...; खडसेंचा...

Eknath Khadse : पन्नासहून अधिक आमदार अन् स्वत: उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांना…; खडसेंचा टोला

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता लवकरच त्यांची दुसरी यादीही लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात अद्यापही जागावाटपासंदर्भात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Despite having more than 50 MLAs and being the Deputy Chief Minister himself Ajitdad has to settle for three seats Criticism of Eknath Khadse)

हेही वाचा – Raj Thackeray : वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील नेत्यांना आदेश

- Advertisement -

राज्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत असताना अजित पवार यांना सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र आता तो सन्मान अजित पवार यांनी हरवला आहे. आज अजित पवार यांच्याकडे 50 हून अधिक आमदार आहेत आणि ते स्वतः उपमुख्यमंत्री आहे. मात्र असे असतानाही त्यांना त्यांच्या पत्नीसह तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. हे चित्र बरोबर नाही, असं मला वाटत असल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची माहिती

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये नितीन गडकरींना नागपूर, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, जालना रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील 25 जागांबाबत भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच भाजपाकडून शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. ज्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येते? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -