घरमहाराष्ट्रभाजप "बुस्टर डोस" सभेच्या माध्यमातून शिवसेनेला घेरणार; आशिष शेलारांचा इशारा

भाजप “बुस्टर डोस” सभेच्या माध्यमातून शिवसेनेला घेरणार; आशिष शेलारांचा इशारा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर उत्तर सभा घेत राज्य सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर ते 3 मे रोजी आता औरंगाबादमध्ये सभा घेण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लवकरचं जाहीर सभा घेण्याची घोषणा केली, यात आता भाजपकडूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेत शिवसेनेला घेरणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे. यंदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन भाजप जोरदार पद्धतीने साजरा केला जाणार आहे. 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील सोमय्या मैदानावर हा रंगारंग कार्यक्रम होणार असून भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “बुस्टर डोस” सभा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे होणारे तडाखेबाज भाषण म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना “बुस्टर डोस” असेल तर महाविकास आघाडीला “डोस” असेल असे आमदार अँड आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसात मेट्रोच्या पत्र्याच्या आड लपून भाजपाच्या पोलखोल सभांवर अती “विराट”म्हणजे एक दोन कार्यकर्ते दगड मारीत आहेत, त्याचा समाचार घेऊन मुंबईसह राज्याच्या विषयांवर सत्ताधारी पक्षाला “डोस” देणारी ही सभा असेल असा इशारा आमदार अँड आशिष शेलार दिला आहे.

आता गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का?

कार्यक्रमात एक तलवार दाखवली म्हणून मोहीत भारतीय यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आता महाराष्ट्रात ज्या पध्दतीने तलवारीचा साठा सापडलाय त्यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? असा सवाल महाराष्ट्र करीत आहे. राज्यातील सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असताना दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी हे षडयंत्र तर नाही ना? अशी शंका ही आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना उपस्थितीत केली.


मंत्रालयातील पद भरती होणार कंत्राटी पद्धतीने; राज्य सरकारचा निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -