घरमहाराष्ट्र९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून मलिकांनी कवडीमोल भावात घेतली जमीन, फडणवीसांचा दिवाळीनंतरचा धमाका

९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून मलिकांनी कवडीमोल भावात घेतली जमीन, फडणवीसांचा दिवाळीनंतरचा धमाका

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केला. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन घेतली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केला. फडणवीस यांनी दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, आज पत्रकार परिषद घेत बॉम्ब फोडला आहे. कुर्ला येथे एलबीएस रोडवरील १ लाख २३ हजार स्केअर फूटची जागा होती. त्याला गोवावाला कंपाऊंड म्हणतात. या जमीनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. या जमिनिची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली. हे दोघेही दाऊदची माणसं होती. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

शाहवली खान कोण?

सरदार शाहवली खान १९९३ बॉम्बब्लास्टचा गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून तो तुरुंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी शाहवली खानने केली होती. बॉम्ब ब्लास्टबाबत जी बैठक झाली त्यावेळी हा हजर होता. गाडीच्या आत आरडीएक्स भरण्यात आले तोच हा शाहवाली खान होता, असेही फडणवीस म्हणाले.

सलीम पटेल कोण?

स्वर्गीय आर. आर. पाटील इफ्तार पार्टीत गेले होते. गुन्हेगारांसोबत त्यांची फोटो दाखविण्यात आला होता. तो दाऊदचा माणूस असल्याचे सांगितले जात होते. यामध्ये आर. आर. पटेलांचा काही दोष नव्हता. मोहम्मद सलिम इशाक पटेल हा दाऊदचा माणूस होता. हसिना पारकरच्या नावाने संपत्ती जमा व्हायची. ते करण्याचं काम सलिम इशाक पटेल करायचा. हा सर्व धंदा चालत होता यामध्ये हसिना पारकरचा सर्वात जवळचा व्यक्ती म्हणून सलिम होता, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

नवाब मलिक मंत्री असताना या जमिनीची खरेदी-विक्री झाली आहे. नवाब मलिकांनी फक्त २० लाख रुपयांत जमीन खरेदी केली आहे. हे दोघे कोण होते? हे तुम्हाला माहिती नव्हते का? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. मला अशा अनेक प्रॉपर्टी सापडल्या असून त्यामध्ये अंडरवर्ल्डचा संबंध आहे. हे सर्व पुरावे मी अॅथॉरिटीला देणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -