घरताज्या घडामोडीमुंबई पालिकेत पुढचा महापौर भाजपचाच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

मुंबई पालिकेत पुढचा महापौर भाजपचाच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शाहांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेत पुढचा महापौर भाजपचाच पाहीजे, असं आवाहन फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

महापालिकेवर आपलाच महापौर बसवायचा यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

देशाला माहिती आहे की चाणाक्य कोण आहे?, मुंबई महापालिकेची निवडणूक ही अशी लढा की ही शेवटचीच निवडणूक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहीजे, असं देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाले. यावेळी भाजपचे बडे नेते आणि मंत्रीही बैठकीत उपस्थित होते. गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, अतुल भातखळकर या नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.

अमित शाह यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. भाजपच्या जागा पाडून शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप यावेळी अमित शाहांनी केला. तसंच मुंबईत भाजप १५० जागा जिंकणार, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

- Advertisement -

फक्त बैठका घेऊन काहीच होत नसल्याचे कळाल्यानंतर भाजपाने शिवसेनेत फूट पाडून ४० आमदारांना आपल्याकडे वळवले. पुन्हा ते मनसेच्या मागेसुद्धा लागले आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद अपुरी पडत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. मात्र, महाराष्ट्राची नवी जनता शिवसेनेसोबत राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार ईडी सरकारला आहे का; राष्ट्रवादीच्या महेश तपासेंचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -