घरमहाराष्ट्रशर्जिल उस्मानी आला, जबाब देऊन गेला, उद्धवजी सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार -...

शर्जिल उस्मानी आला, जबाब देऊन गेला, उद्धवजी सत्तेसाठी किती लोकांना वाचवणार – फडणवीस

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले. असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानीने हिंदू समजाविषयी गरळ ओकली होती. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. शर्जिल उस्मानीविरोधात कारवाईचा बडगा चालवा असे मत विरोधकांनी व्यक्त केले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शर्जिल उस्मानी कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधूण आणणार असे म्हटले होते. परंतु शर्जिल उस्मानी गपचूप येऊन पुण्यातील पोलीस स्थानकात जबाब नोंदवून गेला तरी त्यावर कारावाई करण्यात आली नाही यावरुन विधानसभेचे विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम १५३ अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.

- Advertisement -

खरे तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मुख्यमंत्री उद्धवजी असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा : शर्जीलला माहिती होतं राज्य सरकार कमजोर, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -