घरमुंबईशर्जीलला माहिती होतं राज्य सरकार कमजोर, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

शर्जीलला माहिती होतं राज्य सरकार कमजोर, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Subscribe

पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदुविरोधात शर्जील उस्मानीने गरळ ओकली होती. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शर्जीलवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. परंतु विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शर्जीलला पाताळातून शोधून काढू असे वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शर्जीलला पकडण्यासाठी कधी जाताय असा प्रश्न केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. शर्जीलला माहिती होतं की ठाकरे सरकार कमजोर आहे आपण हिंदुंबाबत काहीही म्हटले तरी कारवाई करु शकत नाही असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे फडणवीसांनी

शर्जिल उस्मानीची उत्तरप्रदेशात हिंदूविरोधात बोलण्याची हिम्मत नव्हती म्हणून तो आपल्या महाराष्ट्रात आला. मुख्यमंत्री तुमच्या पुण्यात तो आला आणि तुमच्या नाकावर टिचून हिंदुंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. तरीही शर्जिलवर सरकार कारवाई करु शकले नाही कारण शर्जिलला माहित होत की, महाराष्ट्रात कमजोर सरकार बसली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जाऊन कमजोर जरी म्हटले तरी हे सरकार माझ्यावर कारावई करु शकत नाही. राज्य सरकार शर्जिलविरोधात काहीही कारवाई करत नाही आहे. शर्जिलला राज्य सरकारचा अशिर्वाद आहे असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा एल्गार परिषदेवर हल्लाबोल


मुख्यमंत्री काय म्हणाले

तुम्ही जरी सोडले तरी शर्जीलला पाताळातून शोधून काढू असे वक्तव्य फडणवीसांनी केले होते. मग फडणवीस पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच शर्जील उस्मानी उत्तरप्रदेशातील घाण आहे. महाराष्ट्रातील नाही. भाजपने आम्हाला हिंदुत्वाबाबत शिकवू नये कारण तेवढी भाजपची पात्रता नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -