घरमहाराष्ट्रनवाब मलिक राष्ट्रवादीचे पोपट, त्यांना बोलण्याशिवाय दुसरं काम नाही - देवेंद्र फडणवीस

नवाब मलिक राष्ट्रवादीचे पोपट, त्यांना बोलण्याशिवाय दुसरं काम नाही – देवेंद्र फडणवीस

Subscribe

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे पोपट आहेत आणि या पोपटात भाजपचा जीव अडकलाय, असं म्हटलं होतं. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपट आहेत आणि ते त्यांना काम नसल्यामुळे बोलत असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी बोलताना नवाब मलिक हे दिवसभर काहीतरी बोलत असतात. सध्या त्यांच्याकडे दुसरं काम नाही, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर उत्तर देण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, पुढे बोलताना त्यांनी कोण कुणाचा पोपट आहे हे माध्यमांसाठी महत्त्वाचं असेल, आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही, असं म्हटलं.

- Advertisement -

काय म्हणाले मलिक?

मला जी शंका होती की जो जीन आहे त्याचा जीव याच पोपटात आहे, आणि पोपट पिंजऱ्यात बंद होणार आहे म्हणून पूर्ण जीन, जे राक्षसी विचाराचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत. कुठेना कुठे तरी जीन घाबरला आहे. कारण, पोपट तुरुंगात गेला तर अजून रहस्य उलगडतील, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवणं कठीण होईल

भाजपच्या बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला. दरम्यान, नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं.

- Advertisement -

काशिफ खानच्या अटकेनंतर अनेकांचा चेहरा समोर येईल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होते. त्याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे बरंच काही समोर येईल, असं नवाब मलिक म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नाही. माझ्याकडे काही हत्यार राहू द्या. हिवाळी अधिवेशन वादळी होणार आहे. आता बोललो तर कोर्टात जातील. विधानसभेमध्ये जे काही आरोप होणार आहेत. त्यावर मी उत्तर देताना जे काही समोर आणणार आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना राज्यात तोंड दाखवणं कठीण होऊन जाईल, असं नवाब मलिक म्हणाले.

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यात माझ्यावर आरोप होणार आहेत. माझं नाव घेऊन हल्ले होणार आहेत. माझ्या जावयाला बदनाम करण्यात आलं आहे. मी आता कुठल्याही नेत्यांचं नाव घेऊन उत्तर देणार नाही ज्यामुळे विषयाला कलाटणी मिळेल. पोपट आहे त्याचा पोपट केल्यानंतर बरंच काही समोर येणार आहे. हिवाळी अधिवेशनात मोठमोठी नावं समोर येतील, असं नवाब मलिक म्हणाले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -