घरमहाराष्ट्रअमरावती हिंसाचाराची चौकशी होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

अमरावती हिंसाचाराची चौकशी होणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Subscribe

मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचा खुलासा

त्रिपुरातील कथित घटनेच्या अफेवेने राज्यात निघालेले मोर्चे आणि त्यानंतर उफाळलेला हिंसाचार या घटनांची चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

अमरावतीमध्ये ४ दिवस संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सुविधाही बंद केली आहे. आज भाजपने अमरावतीच्या ग्रामीण भागात बंद पुकारला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. पण एकूण राज्यातील स्थिती नियंत्रणात आहे, असे वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी राज्यात कोणी मोर्चे काढले त्याची माहिती पोलीस घेत आहेत. यातील सहभागी सर्व संघटनांची चौकशी केली जाईल.हिंसाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गडचिरोलीत पोलिसांनी शनिवारी केलेल्या मोहिमेत २६ नक्षलवादी ठार झाले असून त्यात सहा महिलांचा समावेश आहे. तसेच कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये मध्यवर्ती समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश आहे. काही नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. गडचिरोली पोलिसांची ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. नक्षलवाद्यांच्या विरोधातली पोलिसांची लढाई यापुढे सुरूच राहील. तसेच नक्षलवादी विरोधी मोहिमेसाठी इतर कुमक पाठवण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -