घरमहाराष्ट्रसांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात तब्बल ३५ वर्षानंतर पूरस्थिती

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात तब्बल ३५ वर्षानंतर पूरस्थिती

Subscribe

सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यातील सिध्देवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागला आहे. अग्रणी नदीच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने नदीवरील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव, मोरगांव, हिंगणगांव आणि अग्रण धुळगाव येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. हिंगणगांव पुलावरून मोटारसायकल पुरात वाहून गेली. सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला आहे. मळणगांव येथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोणारवाडी येथील पूल पुराने वाहून गेला आहे. अग्रणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे शुक्रवारी दिवसभर वाहतूक बंद होती. तर शनिवारी अग्रणी नदीला पूर आला होता.

त्यानंतर केवळ पाचव्या दिवशी बुधवारी रात्री एक वाजल्यानंतर दुसऱ्यांदा पूर आला आहे. तर गुरूवारी रात्री एक वाजल्यापासून नदीला जोरात पाणी आले. तासगांव तालुक्यातील सावळज, गव्हाण येथील आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव, मोरगाव, हिंगणगांव आणि अग्रण धुळगाव येथील पुल मध्यरात्रीपासून पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी दिवसभर पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर हिंगणगांव, कोंगनोळी आणि देशिंग परिसरातील गावातील लोक शिरढोण पुलावरून कवठेमहांकाळ येथे येत होते. गुरूवारी रात्रभर दमदार पाऊस सुरू होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुमारे दीड तास कवठेमहांकाळ शहराला अक्षरशः झोडपून काढले.

- Advertisement -

दरम्यान, शिरढोण, बोरगांव तसेच मळणगांव परिसरात दुपारी साडेतीन वाजता दमदार पाऊस झाला. तर सायंकाळी आणि रात्रीसुध्दा अग्रणी नदीच्या लाभक्षेत्रातील सावळज, गव्हाण, मळणगांव, बोरगांव परिसरात पावसाने झोडपून काढले. तासगांव तालुक्यातील सिध्देवाडी तलावाच्या ओसंडून वाहत आहे. अग्रणी नदीवरील मळणगांव, मोरगाव, शिरढोण येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे शनिवारच्या पावसाने तुडूंब भरले आहेत. त्यामुळे सावळज, मळणगांवपासून अग्रणी नदी पाण्याने भरून वाहू लागली आहे. मळणगांव पासून लोणारवाडीपर्यंत अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे. अग्रणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जोरदार पावसानंतर अग्रणी नदीला पूर आला आहे. कोणीही पुलावरून जावू नये, अशा प्रकारचे मेसेज सर्वत्र फिरत होते. मळणगांव, मोरगाव व हिंगणगांव येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक  ठप्प झाली असली, तरी काही बेजबाबदार व बेफिकीर तरूण या तिन्हीही पुलावरून ये-जा करीत होते. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिंगणगांव येथील तरूण गोमटेश पाटील हिंगणगांव पुलावरील पाण्यातून मोटारसायकल ढकलत कवठेमहांकाळकडे येत होता. सुमारास आठ दहा फूट अंतरावर आल्यानंतर त्यांने पाण्याच्या दाबामुळे मोटारसायकल सोडून दिली. मोटारसायकल पुराच्या पाण्यातून वाहून गेली. मात्र तरूण पाटील वाचला आहे.

हेही वाचा –

हा तर महानायक अमिताभ बच्चन यांचा दुसरा जन्म!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -