घरमहाराष्ट्रबैलगाडा शर्यतीतील गुन्हे मागे गृह विभागाचा शासन आदेश जारी

बैलगाडा शर्यतीतील गुन्हे मागे गृह विभागाचा शासन आदेश जारी

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून बंदीच्या काळात बैलगाडा शर्यत भरविणार्‍या आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने नुकताच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. या निर्णयाने बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून बंदीच्या काळात बैलगाडा शर्यत भरविणार्‍या आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने नुकताच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. या निर्णयाने बैलगाडा शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गृह विभागाने खटले मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जीवितहानी झाली असल्यास किंवा 5 लाख रुपयांपेक्षा खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास खटले मागे घेतले जाणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर राज्यात गावोगावी यात्रा उत्सव आणि बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली आहे. परंतु, बंदीच्या काळात बैलगाडा शर्यतींमुळे दाखल झालेल्या खटल्यांमुळे बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, गृह विभागाने बैलगाडा शर्यतीच्या बंदी काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात शासन आदेश जारी करून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली. न्यायालयाने घटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून बैलगाडा शर्यत सुरू करण्यास काही अटी-शर्तींवर परवानगी दिली आहे. पण बंदीच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी बैगलाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील बैलगाडा मालक, बैलगाडा शर्यतींचे आयोजक, बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षकांवर अनेक ठिकाणी खटले दाखल करण्यात आले होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हे खटले मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. त्यानंतर हे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

- Advertisement -

उत्पन्नाचे साधन
ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीची जुनी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागातील लहान मोठे व्यावसायिक शर्यतीशी जोडले जातात. त्यातून होणार्‍या उलाढालीमुळे सर्वांना उत्पन्नाचे साधन निर्माण होते. या शर्यतीत विजयी होणार्‍या बैलगाडा मालकांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. ग्रामीण भागातील बैलांच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब समजली जाते. या शर्यतीसाठी लागणार्‍या चांगल्या जातीच्या खिलार-बैलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -