घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या पत्नी आणि दोन मुलांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ

नवाब मलिकांच्या पत्नी आणि दोन मुलांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ

Subscribe

कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना अटक करण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या पत्नी आणि दोन मुलांना चौकशीसाठी ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. परंतु त्यांच्या परिवाराकडून मनमानी करण्यात येत असल्याचा खुलासा ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला आहे. ईडीने डी गँगशी संबंधात नवाब मलिकांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. मलिकांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मलिकांच्या पत्नीला आणि दोन मुलांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली असल्याचे ई़डीने सांगितले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना डी गँगशी संबंध आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी मेहजबीन यांना दोनवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तर मुलगा फराज मलिक यांना ५ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु पत्नी आणि मुलगा चौकशीला हजर राहिले नाही असे ईडीने आरोपपत्रात सांगितले.

- Advertisement -

नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊदशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. ईडीने मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात ईडीने मलिकांचे डी गँगशी संबंध असल्याची माहिती तपशीलवार दिली आहे. कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंग कंपाऊंड १९९६ मध्ये हडपण्याचा कट रचला होता अशी माहिती ईडीने दिली आहे.

- Advertisement -

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्या जबाबामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याविरुद्ध अनेक पुरावे गोळा केल्याचे ईडीने म्हटले आहे. पारकरने तपास एजन्सीला खुलासा केला आहे की त्याची आई हसिना पारकर (दाऊदची मृत बहीण) हिने कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडचा काही भाग १९९६ मध्ये मलिकांना विकला होता. आपल्या निवेदनात पारकर यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीचे अनेक तपशील दिले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मलिक यांच्या विरोधात खटला चालवण्यास मोठा हातभार लागणार आहे.


हेही वाचा : हिंदू-मुस्लिम बंधुभाव संपवून आपला अजेंडा चालवण्याचा त्यांचा हेतू, पवारांचे ज्ञानवापी मशीद प्रकरणावर मोठं विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -