घरमहाराष्ट्रखडसेंचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राईक'; ६० भाजपवासी राष्ट्रवादीत दाखल!

खडसेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६० भाजपवासी राष्ट्रवादीत दाखल!

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील ६० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश

गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपामधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला आधीच मोठा धक्का बसला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला भगदाड पडणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मात्र आता भाजपाच्या खिंडार पडायला सुरूवात होताना दिसतेय. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये भाजपला पहिला मोठा हादरा बसला. यासह जळगाव जिल्ह्यातील ६० भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

दरम्यान, खडसे यांनी राष्ट्रवादीत पक्षांतर केल्यानंतर काही दिवस होत नाही तर बरेच भाजपवासी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील ६० भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.

अहमदनगरमध्येही भाजपाला मोठा धक्का

अहमदगरमध्ये भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली असता, खडसेंनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळेच कार्यकर्ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांचा बंड

श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला असल्याचे सांगितले जात आहे.


भाजपाचे कार्यकर्ते नाराज असल्याने देतायत राजीनामे; खडसेंनी भाजपावर साधला निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -