घरमहाराष्ट्रमी पक्का माणूस, कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही - एकनाथ खडसे

मी पक्का माणूस, कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही – एकनाथ खडसे

Subscribe

नाथाभाऊ भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा ही माझ्याच हितचिंतकांनी तयार केली - एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना इशारा दिला आहे. मी पक्का माणून आहे. कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही. नाथाभाऊ भ्रष्टाचारी असल्याची प्रतिमा ही माझ्याच हितचिंतकांनी तयार केली, असं खडसे म्हणाले.

माझे अनेक हितचिंतक आहेत. जवळचे आहेत, खूप लांबचे आहेत. काहीजण जवळ राहून माझ्यावर लक्ष ठेवून राहणारे आहेत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता भाजप आमदार गिरीश महाजनांवर निशाणा साधला. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांद्वारे माझी छळवणूक सुरु आहे. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात कोणताही आक्षेप नव्हता. अचानकपणे माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणं, नाथाभाऊ हे भ्रष्टाचारी आहेत अशी प्रतिमा जनमाणसात तयार करणं हे माझ्या हितचिंतकांनी केलेलं काम आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे. मी कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही. मी कुठलीही अशी काही चूक केलेली नाही आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -

आता जे काही सुरु आहेत ते जाणीवपूर्वक केलं जात आहे. छेडछाड करुन आरोप कसा मजबूत करता येईल, असा प्रयत्न आहे. पण मी या सगळ्यातून जनतेच्या आशीर्वादाने बाहेर पडेन आणि दुप्पटपणे उभा राहीन असं खडसे म्हणाले.

जयंत पाटलांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -