घरताज्या घडामोडीSidharth Shuklaने तीन दिवसांपूर्वीच केली होती इन्स्टाग्राम-टि्वटरवर शेवटची पोस्ट

Sidharth Shuklaने तीन दिवसांपूर्वीच केली होती इन्स्टाग्राम-टि्वटरवर शेवटची पोस्ट

Subscribe

टेलिव्हिजनमधील मोस्ट चार्मिंग अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (sidharth shukla death) सिद्धार्थची या जगातून आज अचानक एक्झिट झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडसह हिंदी टेलिव्हिजन इंडस्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तावर चाहत्यांसह इतर कलाकारांना विश्वास बसत नाही आहे. टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेतेच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान सिद्धार्थ शुक्लाने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट २४ ऑगस्टला केली होती. ही पोस्ट #TheHeroesWeOwe असे हॅशटॅग करून कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वॉरियर्ससाठी केली होती. तसेच या पोस्टमध्ये एक मोठे कॅप्शन लिहिले होते. तर ट्विटवर सिद्धार्थने तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ३० ऑगस्टला शेवटचे ट्वीट केले होते. ऑलम्पिकमध्ये भारताचा अभिमान उंचवणारे सुमित अंटिल आणि अवनी लेखारा यांच्यासाठी सिद्धार्थने शेवटची पोस्ट केली होती.

सिद्धार्थची शेवटची इन्स्टा पोस्ट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थचे शेवटचे ट्वीट 

- Advertisement -

२००८ साली सिद्धार्थ शुक्लाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेतून सिद्धार्थने आपल्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर लोकप्रिय मालिका ‘जाने पहचाने से… ये अजनबी’, ‘सीआईडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव यू जिंदगी’ यामध्ये सिद्धार्थ शुक्लाने काम केले. मग २०१३मध्ये ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये त्याने आपला जलवा दाखवला. याशिवाय सिद्धार्थने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

- Advertisement -

सिद्धार्थ २०१६मध्ये ‘खतरो के खिलाडी ७’चा विजेता झाला. त्यानंतर २०१९मध्ये बिग बॉस सीझन १३ मध्ये सिद्धार्थ दिसला होता. या शोमुळे सिद्धार्थची लोकप्रियता आणखीन वाढली आणि बिग बॉस सीझन १३चा सिद्धार्थ विजेता ठरला.


हेही वाचा – siddharth shukla death: बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे निधन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -