घरमहाराष्ट्रआम्ही कमरेचं सोडून डोक्यावर बांधणार नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आम्ही कमरेचं सोडून डोक्यावर बांधणार नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

मुंबईः आम्ही कमरेचं सोडून डोक्यावर बांधणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टिकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी हे उत्तर दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण ही दुर्दैवी घटना होती. पण उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका वैफल्यातून आली होती. फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तरी फडणवीस यांनी संयम बाळगला. ते उद्धट ठाकरे किंवा उद्धवस्त ठाकरे असं म्हणाले नाहीत. त्यांनी टीका केली म्हणून आम्ही टीका करणार नाही. योग्यवेळी त्यांना उत्तर देऊ. फडणवीस यांच्यावर बोलण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला. ते महापौर होते. मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते होते. आता ते अर्थमंत्री आहेत. तुमचं काय कर्तृत्त्व आहे. वडिलांची पुण्याई सोडली तर बाकी काय आहे तुमच्याकडे. ठाकरे नाव काढलं तर तुमच्याकडे काहीच नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

- Advertisement -

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, टीका करुन सहानभूती मिळवू नका. जनतेला सर्व माहिती आहे. तुमचे सर्व खेळ लोकं ओळखतात. वाईट बोलून सहानभूती मिळत नाही. आम्हालाही तिखटं बोलता येतं. पण आम्ही तसे करणार नाही. आमचे तसे संस्कार नाहीत. जनता कामाला महत्त्व देते. तुम्ही अडीच वर्षात काय केलत. आम्ही काय केलं, हे जनतेला माहिती आहे. आज तुम्ही ज्यांच्यासोबत आहात. तेच तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.

तुमच्या काळात किती कांड झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणावरुन उठवलत. कंगना राणावतचं घर तोडलंत. केतकी चितळे आणि एका पत्रकाराला अटक केलीत. आम्ही तसं केलं नाही. आम्ही अन्याय केलेला नाही. बोलण्यासारखं आमच्याकडे खूप काही आहे. पण आम्ही योग्य वेळी सर्व बोलू, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

आव्हान देणारे जन्माला आले नव्हते तेव्हापासू मी राजकारणातः मुख्यमंत्री शिंदे

मला आव्हान देणारे जन्माला पण आले नव्हते तेव्हापासून मी राजकारणात आहे. लोकशाहित कोणीही कुठूनही निवडणूक लढवू शकतो, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -