Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिंदे लबाड नाहीत आणि फडणवीस, अजित पवार हे बेईमान नाहीत; भिडे गुरुजींकडून...

शिंदे लबाड नाहीत आणि फडणवीस, अजित पवार हे बेईमान नाहीत; भिडे गुरुजींकडून सत्ताधाऱ्यांचं कौतुक

Subscribe

आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे, असं भिडे गुरुजी म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेदेखील उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सरकार आपला शब्द पाळेल, असा विश्वासही भिडे गुरूजींनी व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचं कौतुकही केलं.  (Eknath Shinde is not a liar and Devendra Fadnavis and Ajit Pawar are not dishonest Appreciation of rulers from Sambhaji Bhide Guruji )

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक

मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. एक चांगली गोष्ट आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं चालवत आहात. तुमच्या या तपश्चर्येला यश येणार, उगाच ते राजकारणी म्हणून भीती बाळगू नका आणि ते जो शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे सोपवा, असं म्हणत भिडे गुरुजींनी मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं.

- Advertisement -

तसंच, भिडे गुरूजी पुढे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही एक लढाई आहे. एक घाव दोन तुकडे असं हे काम नाही, याला वेळ लागणार. जरांगे पाटील जे करत आहेत, ते संपूर्ण समाजासाठी करत आहेत. परंतु, आता हे उपोषण थांबवून लढा द्यायला हवा. हा लढा लढत असताना आमचे प्रमुख कोण असणार तर जरांगे पाटील, असं म्हणत भिडे गुरूजी यांनी जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा: आरक्षण मिळणारच, पण आता उपोषण थांबवा…; भिडे गुरुजींची जरांगे पाटलांना विनंती )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -