घरमहाराष्ट्रराजकीय आकसापोटी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कारवाई करणं घातक - एकनाथ...

राजकीय आकसापोटी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कारवाई करणं घातक – एकनाथ शिंदे

Subscribe

राजकीय आकसापोटी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कारवाई करणं हे लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार येत असतात, जात असतात; पण राजकीय सूड उगवण्यापोटी कारवाई करणं घातक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे आज ठाण्यात होते, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. “अशा प्रकारची कारवाई सूडभावनेनं, आकसापोटी करणं योग्य नाही. जे दोषी असतील, ज्यांनी गैरप्रकार केले असतील तर ठिक आहे. परंतु, राजकीय लोकांची कारवाई करणं, धाडी टाकणं आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणं हे लोकशाहीला घातक आहे, मारक आहे. सरकार येत असतात, जात असतात. परंतु अशा पद्धतीने राजकीय सुड उगवण्यासाठी कारवाई घातक आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

तुमच्या बापाला घाबरत नाही…

“तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली कशाप्रकारे काम करत आहेत हे आपण पाहताय ना? संपत्ती म्हणताय…ती संपत्ती एखाद्याचं राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतली असेल त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि दबाव आणायचा…मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना झुकणार नाही

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपच्या लोकांनी सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून धमकी दिल्याचा पुनरुच्चार केला. “अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – चु** माणूस आहे तो, महाराष्ट्रद्वेष्टा’; किरीट सोमय्यांचं नाव घेताच संजय राऊत पुन्हा संतापले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -