घरमहाराष्ट्र'चु** माणूस आहे तो, महाराष्ट्रद्वेष्टा'; किरीट सोमय्यांचं नाव घेताच संजय राऊत पुन्हा...

‘चु** माणूस आहे तो, महाराष्ट्रद्वेष्टा’; किरीट सोमय्यांचं नाव घेताच संजय राऊत पुन्हा संतापले

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची ईडीने अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त केली. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांविषयी विचारताच संजय राऊत संतापले आणि सोमय्यांवर शिवराळ भाषेत सणसणीत उत्तर दिलं. चु** माणूस आहे तो, महाराष्ट्रद्वेष्टा आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सोमय्यांवर पुन्हा एकदा आगपाखड केली.

संजय राऊत हे दिल्लीत आहेत. ईडीच्या कारवाईनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवर शिवराळ भाषेत सुनावलं. “चु** माणूस आहे तो, महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो तो आम्हाला अक्कल शिकवणार? त्याचं काय? कोण आहे तो? त्याच्यावरती कसले प्रश्न विचारताय?” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

तुमच्या बापाला घाबरत नाही…

“तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली कशाप्रकारे काम करत आहेत हे आपण पाहताय ना? संपत्ती म्हणताय…ती संपत्ती एखाद्याचं राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतली असेल त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि दबाव आणायचा…मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना झुकणार नाही

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपच्या लोकांनी सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून धमकी दिल्याचा पुनरुच्चार केला. “अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं असं संजय राऊत यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -