घरमहाराष्ट्रअकोले नगरपंचायत १७ पैकी ४ प्रभागांतील निवडणूक स्थगित

अकोले नगरपंचायत १७ पैकी ४ प्रभागांतील निवडणूक स्थगित

Subscribe

एकूण १७ प्रभागांतून एकूण १३८ उमेदवारी अर्ज दाखल

अकोला: येत्या २१ डिसेंबरला होत असलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पुढील निर्णयापर्यंत ओबीसी आरक्षण असलेल्या ४ प्रभागांतील निवडणूक स्थगित करुन १३ प्रभागांतील निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी १७ प्रभागांतून २५ अर्ज दाखल झाल्यानंतर आज ११३ अर्ज दाखल झाल्याने एकूण १३८ अर्ज दाखल झाले आहेत.

बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी १३ प्रभागांतून १०१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बैठकावर बैठका होऊनसुद्धा महाविकास आघाडीमध्ये अद्यापही एकमत झालेले नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने सर्व प्रभागात स्वतंत्रअर्ज दाखल केले आहेत. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सध्यातरी आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून तहसील कार्यालयात गर्दी होती.

- Advertisement -

आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवा नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करत १७ प्रभागांत अर्ज दाखल केले. तर काँग्रेस, शिवसेनेबरोबर मनसेनेही आज अर्ज दाखल केले. सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या निकालानंतर आज दुपारी वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाने ओ.बी.सी. आरक्षण असलेल्या अकोले नगरपंचायतीतील प्रभाग क्र ४, प्रभाग ११, प्रभाग १३, प्रभाग १४ अशा ४ प्रभागांतील निवडणूक स्थगित झाल्याने त्या प्रभागातील अर्ज स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवार नाराज झाले तर भाजपने या आदेशाचा निषेध व्यक्त केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -