घरमहाराष्ट्रपुण्यात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस मिळण्याची शक्यता

पुण्यात 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस मिळण्याची शक्यता

Subscribe

पुणे आयुक्त यासंदर्भात केंद्राकडे पाठवणार पत्र

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दिवसाला ३००० च्या आसपास नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुण्यातील लसीकरण मोहिम १८ वर्षावरील सर्वांसाठी सुरु करण्याचा मागणी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात निर्णय पुणे आयुक्तांनी घेतला आहे. या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या लाटेचे प्रमाण कमी करायचे असेल तर लसीकरण हा प्रमुख उपाय आहे. तसेच डॉक्टर आणि अन्य तज्ज्ञांच्या मते लसीकरणामध्ये पुणे जिल्ह्याला प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा सकारात्मक परिणा होईल व सक्रिय रुग्णांची संख्या कमी होई असे राव यांनी स्पष्ट केले.

तसेच सध्या पुण्यात दररोज २३ ते २४ हजार नागरिकांना लस देण्यात येतात मात्र हे प्रमाण वाढविले तर परिस्थिती नियंत्रणात येईल. यासाठी लशींचा साठा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण केंद्रांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची सूचना पवार यांनी केली आहे; तसेच खासदार गिरीश बापट आणि श्रीरंग बारणे यांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून मागणी मान्य झाल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे,’ असे राव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्राने हा निर्णय मान्य केल्यास पुण्यात १८ वर्षावरील सर्वांना लस देणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- रेखा जरे हत्याप्रकरण : पत्रकार बाळ बोठेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -