घरमहाराष्ट्रप्रत्येकानं बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, गायकवाडांचा अमृता फडणवीसांवर पलटवार

प्रत्येकानं बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, गायकवाडांचा अमृता फडणवीसांवर पलटवार

Subscribe

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिलीय. या वक्तव्याचं मी खंडनच करते, मग ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असो. प्रत्येकानं बोलताना तारतम्य आणि परंपरा पाळली पाहिजे. आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे गांधीजींसारखाच आपल्या जीवनातून एक चांगला संदेश आला पाहिजे. त्याला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्यात.

मुंबईः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या ट्विटवरून वादात सापडल्यात. अमृता फडणवीसांनी राऊत, मलिक आणि पटोले या तिन्ही नेत्यांचा उल्लेख Naughty नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा ट्विटमध्ये उल्लेख केलाय. त्यावरूनच आता सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधलाय.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिलीय. या वक्तव्याचं मी खंडनच करते, मग ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असो. प्रत्येकानं बोलताना तारतम्य आणि परंपरा पाळली पाहिजे. आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे गांधीजींसारखाच आपल्या जीवनातून एक चांगला संदेश आला पाहिजे. त्याला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्यात.

- Advertisement -

दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. कोणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या, त्या ट्विटमध्ये आणखी काही घाणरेडा शब्द वापरण्यात आलेला आहे. मी महिलांच्या बाबतीत काही बोलू इच्छित नाही. पण वाईनचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला आहे, असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय.

- Advertisement -

अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “थोडक्यात उत्तर द्यावे – 50 मार्क्स” असं लिहून त्यापुढे तीन पर्याय दिले आहेत. त्यात “Naughty नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले” असे तीन पर्याय आहेत. “या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात?” असा प्रश्न त्यांनी विचारला. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्यांनी याद्वारे अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे.


हेही वाचाः Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा यू-टर्न; आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून केला आत्मक्लेश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -