घरमहाराष्ट्रपुण्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुण्यात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयात एका शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. दीपक धनगे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

देशाचा मूळ कणा मानल्या जाणार्‍या शेतकऱ्यांवर आपल्या हक्काची लढाई लढत असताना टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयात एका शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. दीपक धनगे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ‘अन्न सुरक्षा’ भ्रष्टाचाराप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने शेतकरी दीपक धनगे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या कर्मचारी-सहकाऱ्यांनी आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

१९ महिने उलटूनही कारवाई नाही

कृषी विभागातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून आणि चौकशी अधिकारी नेमून १९ महिन्यांचा कालावधी झाला आहे. अद्याप नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. संबधितांवर कारवाई न झाल्याने धनगे यांनी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसह कृषी आयुक्तालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर प्रशासन किंवा सरकारी पातळीवर कोणताही कार्यवाही झाली नाही. जोपर्यंत कारवाईसंबंधी लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आयुक्तालयातून हलणार नाही, असा इशारा धनगे यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही काही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

- Advertisement -
Pune Farmer
पुण्यात कृषी आयुक्तांच्या कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

लाभार्थी शेतकरी फक्त कागदावरच!

नेवासा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी २०१५-१६ या वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत बी-बियाणे, खते, औषधे शेतकऱ्यांना न देता त्यांच्या नावे कागदावरच दिल्याचे दाखविल्याचा दावा आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या, खोटे अंगठे मारून आणि खोट्या शेती, शाळाही दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यात दाखवलेला खर्च, दुकाने अस्तित्वात नसलेली बिले जोडून लाखोंच्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे दीपक धनगे यांनी केंद्रीय कृषीमंत्री यांच्यासह संबधितांना लेखी निवेदनासह सादर केले होते.

दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीपक धनगे यांनी या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन ते तालुक्यातील काही कृषी दुकानांत विकले जाते, याबाबतही पुरावे दिले होते. तसेच, या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांनी १९ महिने होऊन देखील चौकशी पूर्ण न केल्याने कृषी अधिकारी सुधीर शिंदे आणि इतर दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी धनगे यांची मागणी आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मंत्रालय ‘लाच’ प्रकरणी, बडोले यांचे स्पष्टीकरण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -