घरमहाराष्ट्रवडिलांनी ऑनलाइन शिक्षणास मोबाईल दिला नाही, म्हणून विद्यार्थ्याने घेतला गळफास!

वडिलांनी ऑनलाइन शिक्षणास मोबाईल दिला नाही, म्हणून विद्यार्थ्याने घेतला गळफास!

Subscribe

घरची परिस्थिती हलाकी व मोबाईल घेणे तात्काळ शक्य नव्हते.

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे, त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांचे वाया जाऊ नये म्हणून सर्वत्र ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. मात्र सांगलीतील जत तालुक्यातील मल्लाळ येथे ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांना आपल्या मुलाला वेळेत मोबाईल न देता आल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

असा घडला प्रकार

जत शहरातील जत हायस्कूल येथे आदर्श हराळे हा शिक्षण घेत होता. तो नुकताच इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला असून दहावीमध्ये प्रवेश घेणार होता. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर त्याच्या शाळेत देखील ऑनलाईन शिक्षण घेण्यात येणार होते. आदर्श यानेही आपल्या शेतकरी वडिलांकडे शिक्षणासाठी मोबाईलची मागणी करत होता. घरची परिस्थिती हलाकी व मोबाईल घेणे तात्काळ शक्य नसल्याने वडील आप्पासाहेब हराळे यांनी आदर्शची समजूत घालून मोबाईल घेणं टाळलं मात्र, सोमवारी आदर्श यांने पुन्हा वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. वडिलांनी मोबाईल घेऊ, असे सांगितले यावेळी आदर्श नाराज झाला.

- Advertisement -

याच शुल्लक कारणावरून तो नैराश्यात गेला आणि याच नैराश्याच्या कारणातून आदर्शने घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, आदर्शच्या वडिलांनीच पोलिसांना संपुर्ण घडलेल्या प्रकाराची माहिती दिली असून आता पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा सन्मान करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -