घरCORONA UPDATECorona : पुण्यात गेल्या २४ तासांत २५ रूग्णांचा मृत्यू

Corona : पुण्यात गेल्या २४ तासांत २५ रूग्णांचा मृत्यू

Subscribe

पुणे शहरात दिवसभरात नव्याने ७५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्णवाढीमुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २९ हजार १०७ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे ८७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्‍या ७२८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १८ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज नव्याने ५५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २८१ जण करोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार १७१ वर पोहोचली असून यांपैकी ४ हजार ८७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कोरोनाची संख्या वाढत असल्याने आजपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा –

पुणे : आयुक्त दिपक म्हैसेकर होम क्वारंटाईन; चालकाला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -