घरमहाराष्ट्रपुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन पहिली बस अहमदनगरकडे रवाना

पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन पहिली बस अहमदनगरकडे रवाना

Subscribe

पुण्याकडून नगर जिल्ह्यात जाण्याकरता ४३ विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली आहे. या ४३ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांना घेऊन ही बस नगरकडे रवाना

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील कानाकोपऱ्यात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिक, गरजू लोकांना घरी पोहचवण्यासाठी लालपरी देखील सज्ज झाली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, स्वारगेट डेपोमधून गुरूवारी पुण्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस अहमदनगरला रवाना झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अहमदनगरकडे ही बस पाठवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नगर जिल्ह्यात जाण्याकरता ४३ विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली आहे. या ४३ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांना घेऊन ही बस नगरकडे रवाना झाली आहे.

- Advertisement -

LockDown: कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी ‘एसटी महामंडळा’चा नवा फंडा!

अशी करण्यात आली विद्यार्थ्यांची व्यवस्था

सृजन फाऊंडेशन आणि MPSC STUDENTS RIGHTS यांच्या प्रयत्नांमधून विद्यार्थ्यांना घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली. गेला दीड महिना स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकून होते. त्यामुळे त्यांच्या जेवणाची गैरसोय आणि आर्थिक चणचण असल्याने हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करत होते.

विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचं पालन

आपल्या घरी जातानाविद्यार्थ्यांकडून सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यात आले. गावी पोहोचल्यानंतरही विद्यार्थांना १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -