घरCORONA UPDATEमनुष्यबळासाठी लॉकडाऊनमध्ये लावला निकाल; आरोग्य विज्ञान विद्यापीठ 

मनुष्यबळासाठी लॉकडाऊनमध्ये लावला निकाल; आरोग्य विज्ञान विद्यापीठ 

Subscribe

कोरोनाच्या लढ्यात सरकारला पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) मॉडर्न मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्सचा (एमएमएसपीसी) निकाल नुकताच लावला.

लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षण विभागाने व राज्यातील सर्वच विद्यापीठानी परीक्षा पुढे ढकलल्या असताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तब्बल २८७३ विद्यार्थ्यांचे निकाल नुकतेच लावले. कोरोनाच्या लढ्यात सरकारला पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) मॉडर्न मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्सचा (एमएमएसपीसी) निकाल नुकताच लावला. यामुळे सरकारला ग्रामीण भागात कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सध्या देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे एमएमएसपीसी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार मार्चमध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचा निकाल तातडीने लावण्याचे आदेश राज्य सरकारने विद्यापीठाला दिले. उन्हाळी सत्राच्या परीक्षेत राज्यातून तब्बल ३ हजार ३६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये आयुर्वेदाची पदवी घेतलेले २ हजार २९५ तर नर्सिंगची पदवी घेतलेले १ हजार ६९ विद्यार्थी होते.

- Advertisement -

 

राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा नियंत्रक विभागाने राज्यातील वैद्यकीय कॉलेजांना निकाल लवकर लावायचे असून तातडीने परीक्षेचे साहित्य विद्यापीठाकडे टपालाने पाठवण्यास सांगितले. परंतु लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका पोहोचविण्यात अडचणी येत होत्या. अशाही परिस्थितीमध्ये विद्यापीठाकडे पोहोचलेल्या २८७३ विद्यार्थ्यांचा निकाल तातडीने लावण्यात आला. यातील २७८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या www.muhs.edu.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

हा निकाल दोन टप्प्यात लावला असून पहिल्या टप्प्यात १४१४ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यातील १३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यात १४५९ विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला असून त्यातील १४०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अद्यापही ४९१ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठापर्यंत पोहोचू न शकल्याने त्यांचा निकाल लावला नसल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -