घरमहाराष्ट्रध्वजारोहण यादी : चूक सरकारची अन् अजित पवारांनी पत्रकारांनाच सुनावले

ध्वजारोहण यादी : चूक सरकारची अन् अजित पवारांनी पत्रकारांनाच सुनावले

Subscribe

कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचे झेंडावंदन करणार या निर्णयावर दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारमधील मंत्र्यांची आणि आमदारांची धुसफूस होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या प्रकरणावरून प्रसार माध्यमांकडून चालविण्यात येणाऱ्या बातम्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

पुणे : राज्यात सध्या तीन चाकांचे सरकार आहे. या तीन चाकांच्या सरकारला ‘त्रिशूळ’ असे नाव देण्यात आले आहे. पण जेव्हापासून राज्य सरकारमध्ये अजित पवार यांनी सहभाग घेतला आहे. तेव्हापासून शिंदे गटाचे आमदार हे सर्वाधिक नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारमधील आमदारांमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. याचा परिणाम हा कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचे झेंडावंदन करणार या निर्णयावर दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारमधील मंत्र्यांची आणि आमदारांची धुसफूस होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या प्रकरणावरून प्रसार माध्यमांकडून चालविण्यात येणाऱ्या बातम्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय त्यांनी आज पुण्यातील कार्यक्रमात पत्रकारांना झापले आहे. (Flag hoisting list: Ajit Pawar told reporters to hide the government’s mistake)

हेही वाचा – पुण्यात विद्वान जास्त… मेट्रोला झालेल्या विलंबावर नितीन गडकरींचे पुणेकरांना टोला

- Advertisement -

काल शुक्रवारी (ता. 11 ऑगस्ट) राज्य शासनाकडून कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचे झेंडावंदन करणार याची यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये पुण्यात चंद्रकांत पाटील, कोल्हापूरात उपमुख्यमंत्री अजित पवार झेंडावंदन करतील अशा प्रकारे नावे नमूद करण्यात आली. पण काही तासानंतर या यादीमध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये पुण्याचे झेंडावंदन राज्यपाल रमेश बैस करतील तर चंद्रकांत पाटील हे रायगडचे झेंडावंदन करतील असे सुधारीत यादीमध्ये नमूद करण्यात आले. ज्यामुळे ही धुसफूस समोर आली.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणावर आज अजित पवार यांनी आपले मत व्यक्त करत पत्रकारांना सुनावले आहे. “आमच्या इथल्या काही पत्रकार मित्रांना हेही माहिती नसते की, पुण्यात 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करतं. पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल हे 15 ऑगस्टला झेंडावंदन करतात. तरी यांना खुमखुमी काय? चंद्रकांत पाटील करणार की राज्यपाल करणार? अरे तुम्हाला काय घेणंदेणं आहे? बातम्या नाहीत तर काहीही बातम्या काढता का?,” असे अजित पवार म्हणाले.

तसेच, राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात झेंडावंदन करतात. पुण्यात स्वातंत्र्यदिनी राज्यपाल झेंडावंदन करतात. राज्यपाल 26 जानेवारीला मुंबईत शिवाजी पार्कात करतात. अशी ही पद्धत आहे. उगीच लोकांच्या मनात गैरसमज करु नका. माहिती नसेल तर माहिती घ्या. मग बातम्या द्या. राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये कुणाला कुठे पाठवायचं हा त्यांना अधिकार आहे, असे म्हणत अजित पवारांनी या धुसफूसीवर पडदा टाकण्याचे काम केले.

पण महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांनी अंतर्गत वाद लपविण्यासाठी हा त्यांच्यातील सावळा गोंळ पत्रकारांच्या माथी फोडला आहे. कारण जर का दरवर्षी राज्यपाल हे पुण्यात 15 ऑगस्टला झेंडावंदन करतात तर याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती का? आणि जर का माहिती होती तर मग पहिल्याच यादीत त्यांनी पुण्याचे झेंडावंदन करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव का टाकले? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पालकमंत्री पदावरून या तीनचाकी सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. याबाबत प्रसार माध्यमांसमोर काही येत नसले तरी हे न कळण्याइतके कोणीच वेडे नाही. एकीकडे शिंदे गटातील आमदार भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, परंतु सरकारमधील एकमेव महिला मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. परंतु गोगावलेंनी सुरुवातीपासूनच या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा केल्याने या जिल्ह्यातील एका विधानसभेचे नेतृत्व करत असताना देखील अदिती तटकरे यांना पालघरचे झेंडावंदन करावे लागणार आहे. त्यामुळे आता वाद सर्वश्रुत असताना देखील अजित पवारांकडून या वादावर पडदा टाकण्याची तळमळ पाहता हे सर्व कधीपर्यंत सुरू राहणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -