घरमहाराष्ट्रप्रॉपर्टी जप्त करून थांबू नये, संजय राऊतांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे -...

प्रॉपर्टी जप्त करून थांबू नये, संजय राऊतांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे – किरीट सोमय्या

Subscribe

''पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, एनआय किंवा ईओडब्ल्यूमधील प्रमाणिक अधिकाऱ्यांचे तोंड बंद करणं असं उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारला वाटत असलं तरी, करावाई ही होणारच'', अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. मुंबईतील १०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यावर आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ”पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, एनआय किंवा ईओडब्ल्यूमधील प्रमाणिक अधिकाऱ्यांचे तोंड बंद करणं असं उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारला वाटत असलं तरी, करावाई ही होणारच”, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

”४८ कोटींच्या गोरेगांव पत्राचाळ घोटाळ्यातील प्रवीण राऊत यांचे मित्र, सेन्ही आणि पार्टनर तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उजवा हात संजय राऊत यांचे व्यवहास बाहेर आले आहेत. तसंच, संजय राऊत यांची पत्नी आणि प्रवीण राऊत यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबाग येथील काही जमीनी आणि मालमत्ता व दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं महणूनच त्यांनी १० महिन्यांपूर्वी स्वत: ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते”

- Advertisement -

“गेल्या दोन महिन्यांपासूनची संजय राऊत यांची धडपड, धावपड, ईडीवर आरोप करणं, बोगस पत्रव्यवहार करणं, किरीट, निल, मेदा सोमय्यांना जेल मध्ये टाकण्याची त्यांचीही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो. त्यांनी काय-काय खटाटोप केला. अलिबागमध्ये चौकशी केली त्यावेळी काय-काय केलं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, संजय राऊत यांनी १२ पानी पत्र लिहावं किंवा राज्यसभेतील अध्यक्षांना पत्र लिहीलं. किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले. पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, एनआय किंवा ईओडब्ल्यूमधील प्रमाणिक अधिकाऱ्यांचे तोंड बंद करणं असं उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारला वाटत असलं तरी, करावाई ही होणारच” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

“काही दिवसांपूर्वी मी दिल्लीतील ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना या षडयंत्रात संजय राऊतांचा रोल काय आहे याचीही चौकशी करण्याचा आग्रह केला होता. त्यांच्या खात्यात पैसे का आले? त्यांनी काय काम केलं? त्यांनी आपल्या पदाचा काय उपयोग आणि दुरूपयोग केला याचीही चौकशी व्हावी. गेले दोन महिने स्वत:ला आणि प्रवीण राऊत यांना वाचवण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले. तसंच, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात अधिवेशनात म्हटलं होतं की, कितीही दबाव आणला तरी, तपास होणार आणि तापासादरम्यान भ्रष्टाचार आढळल्यास त्यावेळी राजकीय नेता असो किंवा इतर कोणीही अधिकारी कारावाई ही होणारं असंही यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

- Advertisement -

“गेल्या काही दिवसांपासून जी नौटंकी चालू होती आज त्याच्यावरून पडदा उठला आहे. आठ महिन्यापूर्वी ५५ लाख स्वत: इडीला देऊन संजय राऊत यांनी स्वत:ची चोरी पकडली होती. तसंच, स्वत:च्या भ्रष्टाचाराची कबूली दिली होती. त्यानंतर मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना ५५ लाख परत का दिले? असा जाब विचारायला हवा होता. असं असलं तरी हे विचारायची जबाबदारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची होती. त्यांनीही संजय राऊतांना विचारलं नाही. त्याउलट पोलिसांना फर्मान देतात की, किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना जेलमध्ये टाका.”

“याप्रकरणी गृहमंत्र्यांनी यांनी ईडीकडून माहिती घेतली पाहिजे अशी माजी मागणी आहे. गृहमंत्री ईडीच्याविरोधात एसआयटी बनवतात. ही घटना कोणी लिहीली उद्धव ठाकरे काय नवीन घटना लिहिणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने चूक अथा भ्रष्टाचार केला असेल, तर त्यासंबंधीत उच्च यंत्रणांना तक्रार करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे.”

“ठाकरे सरकार आपल्या माफिया सरदारांना वाचविण्यासाठी पोलिसांचा माफियासारखा वापर करणार असले तर मी निषेध करत आहे. तसंच, या प्रकरणात प्रॉपर्टी जप्त करून थांबू नये, संजय राऊतांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आहे” असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं.


हेही वाचा – संजय राऊतांचे अलिबागमधील 8 भूखंड, दादरमधील फ्लॅट जप्त, ईडीची मोठी कारवाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -