घरमनोरंजनगुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'खोटी' या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘खोटी’ या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Subscribe

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ओजस्वी मल्टीमीडियाच्या 'खोटी' या आगामी चित्रपटाचा पोस्टर मुंबई येथे रिलीज करण्यात आला. शशिकांत तुपे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिग्दर्शक शशिकांत तुपे यांच्यासह सिनेमाची तगडी स्टारकास्टही तिथे उपस्थित होती.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘खोटी’ या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र अनलॉक होत असताना आता मराठी चित्रपटांनाही चांगले दिवस येऊ लागले आहेत. चित्रपटगृहांना आता शंभर टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली असल्याने अनेक मराठी चित्रपट आता प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ओजस्वी मल्टीमीडियाच्या ‘खोटी’ या आगामी चित्रपटाचा पोस्टर मुंबई येथे रिलीज करण्यात आला. शशिकांत तुपे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिग्दर्शक शशिकांत तुपे यांच्यासह सिनेमाची तगडी स्टारकास्टही तिथे उपस्थित होती. यावेळी अभिनेते विजय पाटकर, विजय कदम, सुहृद वार्डेकर, जयवंत वाडकर, स्मिता रेठरेकर, अस्मिता पांडे आणि संगीतकार मिलिंद मोरे या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शिवाय प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती विनायक मुंडे उपस्थित होते.

- Advertisement -

परंतु या चित्रपटाच्या कथेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र ‘खोटी’ या चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसून येतंय की, हा चित्रपट खेळाडू मुलगी आणि तिच्या कोचवर आधारित आहे. या चित्रपटाला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलेलं असून, ‘ खोटी ‘ या चित्रपटाचे छायाचित्रण सुनील वानखेडे यांनी केलेलं आहे. तसेच रंगराव घागरे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. मात्र, हा चित्रपट जरी खेळावर आधारित असला तरीही या चित्रपटाच्या संपूर्ण कथानकाची कल्पना येण्यासाठी तुम्हाला ट्रेलरची वाट पाहावी लागेल. सिनेमाचे शूटिंग येत्या काही दिवसांत सुरू होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -