घरताज्या घडामोडीअमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिम बांधवांचा नमाज, जगभरात वादाला ठिणगी

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिम बांधवांचा नमाज, जगभरात वादाला ठिणगी

Subscribe

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे. नमाज अदा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे जगात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी टाइम स्क्वेअरवर एकत्र जमून नमाज अदा केली आहे. सोशल मीडियावर या नमाज विरोधात टीका करण्यात येत आहे. रस्त्यावर उतरुन नमाज अदा करुन सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवणं योग्य आहे का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

अमेरिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, मोठ्या संख्यने मुस्लिम बांधवांनी टाइम स्क्वेअरवर नमाज अदा केली आहे. अमेरिकेच्या टाइम स्क्वेअर या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. हा परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो. दरवर्षी ५० दशलक्ष नागरिकांपेक्षा अधिक पर्यटक येथे भेट देत असतात. अशा परिस्थितीत मशिदीऐवजी या व्यावसायिक परिसरात नमाज अदा करण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना न्यूयॉर्क शहरात प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी रमाजनचा सण साजरा करावा आणि इस्ला धर्म किती शांतताप्रिय आहे. याबाबत इतरांना कळावे अशी इच्छा होती. इस्लामबद्दल जगभरात अनेक गैरसमज आहेत. ज्यांना त्याबद्दल माहिती नाही अशा लोकांना आम्हाला आमच्या धर्माबद्दल सांगायचे होते असे आयोजकांनी सांगितले आहे. ‘इस्लाम हा शांतीचा धर्म आहे. असे असूनही इस्लामबाबत जगभरात अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत. चुकीच्या विचारसरणीचे लोक प्रत्येक संस्कृतीत, धर्मात आढळतील आणि हे मूठभर लोक बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना शनिवारपासून सुरू झाला आहे. चंद्रदर्शनानंतर रमजानची घोषणा करण्यात आली आहे.

‘इस्लाम आम्हाला हे शिकवत नाही’

टाइम स्क्वेअरवरील नमाज अदा करण्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. संयुक्त अरब अमिराती (UAE) सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हसन सजवानी यांनीही यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘रस्त्यावर नमाज अदा केल्याने लोकांची गैरसोय होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये २७० हून अधिक मशिदी आणि प्रार्थना करण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. धर्माचे प्रदर्शन करण्यासाठी लोकांचा मार्ग अडवण्याची गरज नाही. इस्लाम आपल्याला हे शिकवत नाही. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिले आहे की, मी मुस्लिम आहे, पण टाईम्स स्क्वेअरवर नमाज अदा करण्याचे समर्थन करणार नाही. तर काहीं नेटकऱ्यांनी त्याचे समर्थनही केले आहे.

- Advertisement -


हेही वाचा :  केंद्रीय अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला; पोलिसांकडून तपास सुरु

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -