घरमहाराष्ट्रमारहाणीनंतर बी. एस. पाटीलांनी केली पोलिसांत तक्रार दाखल

मारहाणीनंतर बी. एस. पाटीलांनी केली पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर माजी आमदार बी. एस. पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अमळनेर येथे सेना-भाजपा मेळाव्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सात जणांविरोधात बी. एस. पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार हे गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेतून खान्देवातील भाजप नेत्यांचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अमळनेर येथे बुधवारी सेना-भाजप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे माजी आमदार बी. एस. पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ मंचावर उपस्थित होते. दरम्यान उदय वाघ यांच्या समर्थकांनी बी. एस. पाटील यांना मंचावरून खाली उतरवण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. तेवढ्तात मंचावर बी. एस. पाटील यांच्या शेजारी बसलेल्या उदय वाघ यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाघ समर्थकही मंचावर आले आणि त्यांनी पाटलांना मारहाण केली. या दरम्यान गिरीश महाजन यांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता त्यानाही धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर आता बी. एस. पाटील यांनी वाघ आणि अन्य ७ जनांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -