घरताज्या घडामोडीमनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं निधन

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचं निधन

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून काम करणारे त्यांचे सहकारी म्हणून ओळख असलेले मनसेचे माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ओझर येथे सकाळी एका तरणतलावात पोहण्यासाठी गेले असताना त्यांना त्याठिकाणी त्यांना त्रास होऊ लागल्याने तेथीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना नाशिक मधील अपोलो रुग्णालयात हलवले असता त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचा अंतविधी पार पडेल. ५० वर्ष वय असलेल्या अनंता सूर्यवंशी यांना काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला जावं लागल्यानंतर गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या सभेसाठी नाशिक व उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या कार्यकर्त्याच्या नियोजनाची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे सोपवून त्यांचा अनुभव पक्षात घेता त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांना नव्याने मोठी जबाबदारी देण्याचाही मानस वरिष्ठांचा होता.

नगरसेवक काळात त्यांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून तसेच पक्षीय राजकारणातही आपल्या कार्यशैलीने आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. असा एका उदयोन्मुख पदाधिकारी अकाली निघून गेल्याने मनसेच्या तसेच नाशिकच्या राजकीय क्षेत्रात मोठी शोकांतिका पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -